Nepal PM Resignation: नेपाळमध्ये वातावरण तापलं!पंतप्रधान केपी शर्मा ओलींचा राजीनामा

 
ब्युरो टीम : नेपाळ सरकारमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात होता. मात्र, आंदोलन हिंसक होत असल्याचं पाहून पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

नेपाळमधील राजकीय स्थिती कमालीची तणावपूर्ण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नेपाळमधील मोठ्या संख्येने तरुणाई रस्त्यांवर उतरून सरकारविरोधात आंदोलन करीत आहे. आधी सोशल मीडिया साईट्सवर बंदी घातल्याचा निषेध या तरुणाईनं केला. त्यावर १९ तासांनी ही बंदी सरकारला उठवावी लागली. मात्र, त्यानंतरदेखील रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईचा असंतोष कमी झाला नाही. देशातील वाढत्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी आता येथे तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने