शहरामध्ये १४ व १५ सप्टेंबर असे सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात झाडे, फांद्या पडल्या. याबाबतची माहिती अग्निशमन विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तातडीने झाडे, फांद्या हटविण्याचे काम सुरू केले. १४ व १५ सप्टेंबर (सायंकाळी ४ वाजेपर्यंत) या दोन दिवसांमध्ये अग्निशमन विभागाच्या वतीने १० ठिकाणांतील झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली आहे, अशी माहिती अग्निशमन विभागातून देण्यात आली. तसेच अर्धवट पडलेल्या झाडापासून नागरिकांनी दूर म्हणजेच सुरक्षित अंतर बाळगावे, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अग्निशमन विभागाचे महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक:
- पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७५
- भोसरी अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७६
- प्राधिकरण अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७७
- चिखली अग्निशमन केंद्र – ८६६९६९४१०१
- थेरगाव अग्निशमन केंद्र – ७०३०९०७९९९
- रहाटणी अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७८
- मोशी अग्निशमन केंद्र – ७२६४९४३३३३
- तळवडे अग्निशमन केंद्र – ९५५२५२३१०१
- चोविसावाडी अग्निशमन केंद्र – ८४८४८०३१०१
- नेहरूनगर अग्निशमन केंद्र – ८४८४०५११०१

टिप्पणी पोस्ट करा