या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार व नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे तसेच नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याचबरोबर खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे तसेच आमदार अमित गोरखे, उमा खापरे, महेश लांडगे, शंकर जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह अनेक मान्यवर, माजी लोकप्रतिनिधी,ज्येष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक उपस्थित राहणार आहेत. तरी या स्वच्छतेच्या उपक्रमात शहरवासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
PCMC : ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत पिंपरीत होणार स्वच्छतेचा उत्सव....
ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता पिंपरी येथील शगुन चौक, डिलक्स चौक, पिंपरी कॅम्प व रेल्वे स्टेशन रस्ता, साई चौक रस्ता या परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी स्वच्छतेची शपथ घेऊन मोहिमेस सुरूवात होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा