Sangli : सांगली जिल्ह्यात फिरते लोकअदालत, कायदेविषयक शिबीर

ब्युरो टीम :  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामधील सर्व तालुक्यामध्ये दिनांक 8 सप्टेंबर 2025 ते दिनांक 4 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये विविध गावांमध्ये फिरत्या लोकअदालतीचे व कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले आहे. लोकअदालत व कायदेविषयक शिबीर आयोजित केलेल्या ग्रामपंचायतीमधील पक्षकारांनी न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणेही फिरत्या लोकअदालतमध्ये ठेवण्यात आली आहेत.  ही प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवून वाद संपुष्टात आणावा, असे आवाहन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी केले.

फिरत्या लोकअदालत कार्यक्रमाची हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे, अति. जिल्हा सरकारी विधिज्ञ व्ही. एम. देशपांडे, सांगली मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी तसेच सांगली बार संघाचे अध्यक्ष अशोक वाघमोडे व वकील बार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी फिरत्या लोकअदालत कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले व उपस्थितांना त्याबाबची माहिती देऊन आभार मानले.

फिरत्या लोकअदालत व जनजागृती शिबीराचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:

दिनांक 8 सप्टेंबर ग्रामपंचायत बुधगांव ता. मिरज, दि. 9 सप्टेंबर ग्रामपंचायत बावची ता. वाळवा,  दि. 10 सप्टेंबर ग्रामपंचायत ऐतवडे खुर्द ता. वाळवा,  दि. 11 सप्टेंबर ग्रामपंचायत सागांव ता. शिराळा,  दि. 12 सप्टेंबर ग्रामपंचायत बिळाशी ता. शिराळा, दि. 15 सप्टेंबर ग्रामपंचायत शाळगांव ता. कडेगांव, दि. 16 सप्टेंबर ग्रामपंचायत चिंचणी ता. कडेगांव, दि. 17 सप्टेंबर ग्रामपंचायत बांबवडे ता. पलूस, दि. 18 सप्टेंबर ग्रामपंचायत कुंडल ता. पलूस, दि. 19 सप्टेंबर नगरपंचायत खानापूर ता. खानापूर, दि. 20 सप्टेंबर ग्रामपंचायत नागेवाडी ता. खानापूर, दि. 22 सप्टेंबर ग्रामपंचायत माडगुळे ता. आटपाडी, दि. 23 सप्टेंबर ग्रामपंचायत कौठोळी ता. आटपाडी, दि. 24 सप्टेंबर ग्रामपंचायत मांजरडे ता. तासगांव, दि. 25 सप्टेंबर ग्रामपंचायत चिंचणी ता. तासगांव, दि. 26 सप्टेंबर ग्रामपंचायत लिंगनूर ता. मिरज, दि. 29 सप्टेंबर ग्रामपंचायत आरग ता. मिरज, दि. 30 सप्टेंबर ग्रामपंचायत सरती ता. कवठेमहांकाळ, दि. 1 ऑक्टोबर ग्रामपंचायत शिरढोण ता. कवठेमहांकाळ, दि. 3 ऑक्टोबर ग्रामपंचायत संख ता. जत, दि. 4 ऑक्टोबर ग्रामपंचायत डफळापूर ता.जत.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने