मंत्री उदय सामंत हे काल (१२ सप्टेंबर) रात्री उशिरा अहिल्यानगर शहरात कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी मंत्री सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठा - ओबीसी आरक्षण, बोगस प्रमाणपत्र वाटप तसंच राज्यातील इतर विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, 'हैदराबाद गॅझेट समितीची तयार करण्यात आलेली आहे. त्याचा सदस्य मी होतो. हैदराबाद गॅझेट जाहीर करत असताना ओबीसी समाजाचे कोणतंही आरक्षण कमी होऊ नये, हे दक्षता घेऊनच तो जीआर काढण्यात आल्याचा खुलासा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री पंकजा मुंडे यांनी बोगस प्रमाणपत्राचा मुद्दा मांडला होता. यावर बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, 'कोणतंही बोगस प्रमाणपत्र दिलं गेलं तरी तातडीनं रद्द होते जर खोटे प्रमाणपत्र असतील तर ते आपण रद्द करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री छगन भुजबळांच्या मनामध्ये जर शंका असतील तर त्या स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दूर करतील. मंत्री भुजबळ यांनी एखादी भूमिका घेतल्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य नाही, त्यांच्या मनातली शंका विखे पाटील देखील दूर करू शकतात आणि आमच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सर्व सहकारी देखील दूर करू शकतात,' असेही ते म्हणाले.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा