Beed : आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त बीडमध्ये शपथ व अग्निशमन प्रात्यक्षिकाचे सादरीकरण

 
ब्युरो टीम : आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिनाचे औचित्य साधून, दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात 'आपत्ती धोके निवारण' दिनानिमित्त शपथ ग्रहण समारंभाचे व अग्निशमन प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.

सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास हरिष धार्मिक, अपर जिल्हाधिकारी, बीड आणि शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बीड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, तसेच अग्निशमन पथक, नगरपरिषद बीड आणि बीड मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी व आपदा मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व उपस्थितांना आपत्ती धोके निवारणासंदर्भात शपथ देण्यात आली. त्यानंतर, या दिनानिमित्त जनजागृतीपर सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणून, किशोर जाधव, अग्निशमन अधिकारी, नगरपरिषद बीड यांनी जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकामार्फत अग्निशमन उपकरणे चालविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. या प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थितांना आपत्तीच्या प्रसंगी तात्काळ प्रतिसाद कसा द्यावा, तसेच कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी,  प्रशांत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी अध्यक्षांच्या परवानगीने उपस्थित सर्वांचे आभार मानले. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने