या पदांसाठी उमेदवारांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्जासोबत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र व आधार कार्डची छायांकित प्रत जोडावी. या पदांसाठी नागरी उमेदवारही अर्ज करू शकतात; परंतु माजी सैनिकांना यामध्ये प्राधान्य दिले जाईल. मुलाखतीची तारीख स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.
Job Update : सैनिकी वसतीगृहात कंत्राटी स्वरूपात पदांची भरती
ब्युरो टीम : सैनिकी मुला–मुलींच्या वसतीगृहात, माजी सैनिक विश्रामगृह व महासैनिक लॉन्स, अहिल्यानगर येथे तात्पुरत्या स्वरूपात स्वयंपाकी, सफाई कामगार, माळी व चौकीदार या पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी २७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहिल्यानगर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा