ब्युरो टीम : आर्मी पब्लिक स्कूल (एमआयसीएस), अहिल्यानगर येथे प्राचार्य पदासाठी पात्र उमेदवारांकडून दि. ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्राचार्य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे स्नातकोत्तर (Post Graduate) पदवी किंवा तत्सम शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. बी.एड. (B.Ed.) पदवी अनिवार्य आहे. उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक स्तरावर किमान पाच वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असावा. सर्वसाधारण उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वय ५५ वर्षे, तर भूतपूर्व सैनिक उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वय ५७ वर्षे (अर्जाच्या अंतिम दिनांकापर्यंत) राहील.
पात्रता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. पात्र उमेदवारांना पॅनल मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवाराचे वेतन चर्चेनुसार निश्चित करण्यात येईल. एडब्ल्यूईएसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार इतर भत्ते व लाभ देण्यात येतील.
अर्जाचा नमुना शाळेच्या संकेतस्थळावरून (www.apsmicsahmednagar.com) डाउनलोड करावा. पूर्ण भरलेला अर्ज, बायोडाटा (जन्मतारीख व नवीन छायाचित्रासह), अध्यापनाचा तसेच उपप्राचार्य/प्राचार्य/प्रशासकीय कार्याचा अनुभव, सेवाकाळाची माहिती, शैक्षणिक प्रमाणपत्रे व प्रशस्तिपत्रांच्या प्रती, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक व संपूर्ण टपाल पत्ता यासह संचालक, मुख्यालय दक्षिण कमांड (A.W.E.S.), पिन – ९०८५४१, C/O ५६ A.P.O., पुणे – ४११००१ या पत्त्यावर फक्त हार्ड कॉपी स्वरूपात सादर करावा.

टिप्पणी पोस्ट करा