Ahilyanagar Crime : 14 लाख 75 हजार रुपये किमतीची घरफोडी करणारा आरोपी असा पकडला

ब्युरो टीम : अहिल्यानगर येथील विराज कॉलनी या ठिकाणी 14 लाख 75 हजार रुपये किमतीची घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचेकडुन जेरबंद  करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावेडी भागातील विराज कॉलनी येथे राहणाऱ्या अशोककुमार विजयकुमार अग्रवाल हे नातेवाईकांकडे बाहेर गावी गेलेले असतांना दिनांक 13/12/2025 ते दिनांक 16/12/2025 या कालावधीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे पाठीमागील दरवाजाचे लॉक कशाने तरी तोडुन आत प्रवेश करुन लॉकर व कपाटातील सोने, चांदी चे दागिने, घड्याळ, रोख रक्कम असा एकुण 14 लाख 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(3), 331 (4), 305 (a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला1

सदर चोरीची घटना घडल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,  उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर येथील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुरेश माळी, शाहिद शेख, गणेश धोत्रे, फुरकान शेख, प्रकाश मांडगे, रोहित येमुल, अमृत आढाव, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन रवाना करण्यात आले होते.  पथकाने अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपींची माहिती संकलित करुन त्या आधारे तपास करत असतांना पथकास व्यवसायीक कौशल्याचे आधारे सदरचा गुन्हा हा रफिक महेबुब शेख (रा. ठाणे) याने व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार ठाणे या ठिकाणी जावुन आरोपीचा शोध घेत असतांना सदरचा आरोपी हा राबोडी, जि. ठाणे या ठिकाणी असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन खात्री करता एक संशयीत इसम मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव रफिक मेहबुब शेख (वय 43 वर्षे, रा. पहिली राबोडी, जुम्मा मस्जिदचे पाठीमागे, बापुजीनगर, राबोडी, ठाणे वेस्ट) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे वर नमुद गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे इतर दोन फरार साथीदारांसह असल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस  करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने