Amravati : मेरा युवा भारततर्फे तालुकास्तरीय खेळ स्पर्धा


ब्युरो टीम : अमरावती जिल्ह्यात मेरा युवा भारत आणि नांदगाव खंडेश्वर जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथे विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.

यावेळी जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भूपेंद्र जेवडे, तालुका वकील संघ उपाध्यक्ष मोहन जाधव, शीतल काळे उपस्थित होते.

यात कबड्डी, खो-खो, 100 मीटर मुलांचे धावणे, गोळाफेक, 100 मीटर मुलींची धावणे, खो-खो या स्पर्धेत विजेता संघाला प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक, तसेच वैयक्तिक खेळाडूंना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पारितोषिक म्हणून मेरा युवा भारत अमरावती, युवा कार्यक्रम विभाग युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार ही ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.

या स्पर्धा मेरा युवा भारतच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूपेंद्र जेवडे यांनी आयोजित केल्या. स्पर्धेसाठी जन स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी पुढाकार घेतला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने