ब्युरो टीम : भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संगमनेर व फॉरेस्ट वाहूतदार संघटना, किसानसभा संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.२५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वा. लालतारा कार्यालय अकोले नाका, संगमनेर येथे विविध विषयांवर विचार-विनिमय करून प्रमुख कार्यकत्यांची बैठक पडली, यावेळी बैठकीचे अध्यक्ष कॉ. बापू कानवडे यांची निवड करण्यात आली असून सूचना कॉ. भिका वाघ यांनी मांडली तर कॉ. प्रताप सहाणे यांनी अनुमोदन दिले. यावेळी सयाजी कानवडे, ॲड. ज्ञानदेव सहाणे, नारायण मेमाणे सर, लक्ष्मण रोडे, किसनराव गंभीरे, पोपट चौधरी, कॉ. दशरथ हासे, कॉ. रघुनाथ पवार, रजत अवसक, अनिकेत घुले,दत्ता ढगे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध गावांमधून ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अनेकांनी तालुक्यातील त्यांच्या गावांमधील प्रश्न, समस्या मांडल्या असून ६ जानेवारी रोजी प्रांताधिकारी संगमनेर यांना या सर्व विषयावर निवेदन देण्यात येणार आहे.
बैठकीत फॉरेस्ट वाहुतदार पीक पहाणी, फॉरेस्ट वाहूतदार उतारा नोंदी, कर्ज प्रकरणे, जिल्हा व पंचायत समिती निवडणूक, पेसा व डार्क झोन यासोबत अन्य विषयांवर सकारात्मक चर्चा करून निवेदने देण्याचे ठरले असून वेळ पडल्यावर रस्त्यावर उतरून लढा देण्याचेही ठरले आहे.
पक्षाकडून सर्व ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गणात उमेदवारी- अनेक इच्छुकांची नावे
जिल्हा परिषद गट- चंदनापुरी, साकुर, धांदरफळ बुद्रुक, बोटा, समनापूर, तळेगाव, आश्वी बुद्रुक, जोर्वे, घुलेवाडी .
चंदनापुरी जिल्हा परिषद गटातून भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष, शिवआर्मी शेतकरी संघटनेचे संस्थापक दत्ता ढगे यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांना समविचारी पक्ष आणि संघटना पूर्णपणे समर्थन देऊन याठिकाणी कोणतीही उमेदवारी देणार नाहीत. पक्ष संघटनेत विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला यांसह विविध यशस्वी लढे दिले असून अनेकदा मोर्चे काढले असून वेळप्रसंगी तुरुंगवास सुद्धा जनतेच्या प्रश्नावर सोसला आहे.
दरम्यान, २६ डिसेंबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्ष महोत्सव साजरा होत आहे, त्यानिमित्ताने संगमनेर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते अहिल्यानगर येथे शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा