PCMC Election :बूथ लेव्हल ऑफिसर यांना निवडणूक विषयक कामकाजाबाबत केले मार्गदर्शन


ब्युरो टीम : 
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कार्यरत बूथ लेव्हल ऑफिसर यांच्यासाठी निवडणूक विषयक कामकाजाबाबत मार्गदर्शन बैठक डॉ. हेडगेवार भवन , निगडी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ लेव्हल ऑफिसर यांची भूमिका व जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे यांनी बूथ लेव्हल ऑफिसर यांना मतदार केंद्राची माहिती संकलन व अद्ययावत ठेवणे, मतदान केंद्रांवरील प्राथमिक सुविधांचा आढावा घेणे, शाळांमध्ये होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाही याची खातरजमा करणे, मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देणे तसेच मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करून घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

यासोबतच मतदारांना मतदान यंत्र (ईव्हीएम) वापराबाबत योग्य माहिती देणे, मतदान प्रक्रिया समजावून सांगणे आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही त्यांनी भर दिला.

या बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश डोईफोडे, निवेदिता घार्गे यांच्यासह संबंधित अधिकारी व बूथ लेव्हल ऑफिसर मोठ्या संख्येने उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने