ब्युरो टीम : थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, कृषी शिक्षणाचे अग्रदूत व भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.
महापालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
अभिवादन प्रसंगी बोलताना उप आयुक्त बोदडे म्हणाले की, 'डॉ. पंजाबराव देशमुख हे थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक व कृषी शिक्षणाचे अग्रदूत होते. ग्रामीण व शेतकरी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला. ते भारत सरकारचे पहिले कृषी मंत्री होते. अमरावती येथे त्यांनी श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाची स्थापना करून शिक्षण क्रांतीला नवी दिशा दिली.या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी खेड्यापाड्यात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचवली. त्यांच्या कार्यामुळे शेतकरी व ग्रामीण युवकांना शिक्षण व विकासाच्या संधी उपलब्ध झाल्या.'

टिप्पणी पोस्ट करा