ब्युरो टीम: ग्राहकांचे सुरक्षिततेचा हक्क, माहिती मिळविण्याचा हक्क, निवडीचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, बाजू ऐकून घेतली जाण्याचा हक्क तसेच ग्राहक शिक्षणाचा हक्क आदी हक्कांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, यासाठी ग्राहकांनी जागरूक राहून शासनाला सहकार्य करावे, आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्यांची जाणीव ठेवावी, खरेदी करताना किंमत व गुणवत्तेची तपासणी करावी तसेच फसवणूक टाळण्यासाठी योग्य ठिकाणी तक्रार निवारणासाठी दाद मागावी, याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले. यावर्षी ग्राहक दिनानिमित्त “Efficient and Speedy Disposal through Digital Justice” ही संकल्पना निश्चित करण्यात आली होती.
त्याच अनुषंगाने जिल्हा पुरवठा कार्यालय, रायगड–अलिबाग, अन्न व औषध प्रशासन, पेण, वैध मापन विभाग, अलिबाग तसेच प्रिझम सामाजिक विकास संस्था, चेंढरे–अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ डिसेंबर रोजी अलिबाग समुद्रकिनारा व अलिबाग बस स्थानक येथे “जागो ग्राहक जागो” पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्यातून ग्राहकांच्या अधिकारांविषयी प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, रायगड–अलिबागचे मा. न्यायमूर्ती विजय जाधव, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीम. दिपाली ब्राम्हणकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी हर्षल देशमुख, प्रिझम संस्थेच्या श्रीम. तपस्वी गोंधळी व सहकारी, पुरवठा शाखेचे कर्मचारी, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पेण, सहाय्यक नियंत्रक, वैध मापन विभाग तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा