Raigad : 'या' मार्गावर जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अ


ब्युरो टीम :
31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतानिमित्त रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून खारपाडा ते कशेडी (मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66), माणगांव-ताम्हाणी घाटमार्गे दिघी (रा.मा. क्र. 753-फ), कर्जत-पळसदरी-खोपोली-पालीफाटा-वाकण (रा.मा. क्र. 584-अ), वडखळ-अलिबाग (रा.मा. क्र. 166-अ), चौकफाटा-कर्जत राज्यमार्ग, अलिबाग-मुरुड राज्यमार्ग व अलिबाग-मांडवा या महामार्ग व राज्यमार्गांवरून दि.31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 08.00 वाजल्यापासून ते दि.01 जानेवारी 2026 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे.

रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याकारणाने दि.31 डिसेंबर 2025 रोजी "थर्टी फस्ट" चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागता करीता प्रचंड प्रमाणात पर्यटक हे मांडवा, किहीम, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरूड, दिवेआगर, श्रीवर्धन, महाड, कर्जत, माथेरान, खालापूर, इमॅजिका, पाली,महड, रायगड किल्ला अशा पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात आपआपली वाहने घेवून येत असतात. सध्या नाताळ निमित्ताने विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याकारणाने पर्यटक हे रायगड जिल्ह्यामध्ये फिरण्याकरीता वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावरील बीचला भेटी देत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असून त्यातच महामार्गावरील जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. 

ही वाहतूक बंदी दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जीवनाश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिकायांना  लागू राहणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी नियोजन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने