विक्रम बनकर, अहिल्यानगर : अहिल्यानगर शहर मतदार संघ हा 'ओबीसी'चा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. ओबीसीसाठी जर महापौरपदाचा आरक्षण पडले असेल, तर 'मूळ ओबीसी' उमेदवाराला महापौर पदावर संधी द्यावी, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांनी केले आहे. या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
अहिल्यानगर महापालिकेतील महापौर पदाचं आरक्षण महिला ओबीसीला जाहीर झालं आहे. पण महापौर पदावर 'मूळ ओबीसी' बसणार की, 'कुणबी' यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच आता आगरकर यांनी मोठं वकत्व केले आहे.
आगरकर म्हणाले,' अहिल्यानगर महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. युतीला जवळपास 52 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे युतीचाच महापौर होईल हे स्पष्ट आहे. परंतु युतीत सर्वाधिक जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या, असल्यामुळे त्यांचाच महापौर होईल, असे दिसते आहे. भाजपचा जुना कार्यकर्ता म्हणून महापौर पदावरील संधीचा तोडगा हा सामंजस्याने निघाला पाहिजे. यामध्ये 'मूळ ओबीसी'ला प्रामाणिकपणे संधी दिली पाहिजे, असं माझं मत आहे,' असेही आगरकर यांनी म्हंटले आहे.
पहा व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा