Ahilyanagar : रस्ता सुरक्षा अभियान २०२६ च्या निमित्ताने मोटारसायकल रॅली उत्साहात संपन्न


ब्युरो टीम :
राज्यात १ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान 'रस्ता सुरक्षा अभियान २०२६' राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर शहरामध्ये मोटारसायकल रॅली अत्यंत उत्साहात पार पडली.

​प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्ह्यात रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयातून या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला.

​या रॅलीद्वारे संपूर्ण शहरात हेल्मेटचा वापर करणे, सीट बेल्ट लावणे, पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणे, वाहने सावकाश चालवणे व वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. तसेच, रस्ता सुरक्षेबाबत वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले.

​या रॅलीत अधिकारी, कर्मचारी, दुचाकी वाहन वितरक आणि मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे चालक-मालक यांनी सहभाग घेतला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने