ब्युरो टीम : राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत महाराष्ट्र नगर विकास विभागाकडून काढण्यात येणार आहे. ही सोडत येत्या गुरुवारी (२२ जानेवारी २०२६) मंत्रालयात काढण्यात येणार आहे. याबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्यातील महानगरपालिका निकालानंतर सर्वांना महापौर निवडीचे वेध लागले आहे. आता राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्याबाबतचा निर्णय झाला आहे. मुंबईत नगरविकास विभागातर्फे ही सोडत काढण्यात येणार आहे.
महापौरपद आरक्षण सोडत २२ जानेवारीला काढण्यात येणार. अधिसूचना जारी.#महानगरपालिका #महानगरपालिका_निवडणूक pic.twitter.com/8I8gKQVND3
— मराठी Print (@Marathi_print) January 19, 2026
यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यातील २९ पैकी २४ ठिकाणी भाजपा व महायुतीची सत्ता आली आहे. त्यामध्ये ९ महानगरपालिका निवडणुका स्वबःळावर लढल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा