PCMC Election :ईव्हीएम व स्ट्रॉंग रूम सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नको – आयुक्त श्रावण हर्डीकर


ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी आज इंद्रायणी नगर ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय तसेच ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय येथे ईव्हीएम मशीन व स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. यावेळी ईव्हीएम व स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करता कामा नये, असे निर्देश आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिले.

यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, डॉ. दिप्ती सूर्यवंशी, डॉ. अर्चना पठारे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, तानाजी नरळे, पूजा दुधनाळे,सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे,कार्यकारी अभियंता शिवराज वाडकर,सोहम निकम,सतीश वाघमारे  उपस्थित होते.

आयुक्त हर्डीकर यांनी यावेळी ईव्हीएम मशीन तपासणी, स्ट्रॉंग रूमची पाहणी, मतमोजणीसाठी लावण्यात येणाऱ्या टेबलांची व्यवस्था तसेच त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले नकाशे यांची तपासणी केली. यासोबतच सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही व्यवस्था आणि मॉकपोल प्रक्रियेचीही माहिती घेतली.

सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपापली कामे अत्यंत काटेकोरपणे व वेळेत पार पाडावीत, तसेच ईव्हीएम व स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश यावेळी आयुक्त हर्डीकर यांनी दिले. लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी स्ट्रॉंग सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने