ब्युरो टीम : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. गोविंद बाग येथून त्यांना खासगी कारमधून पुण्याच्या दिशेने हलवण्यात आलं असून रुबी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.
शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे देखील आहेत. शरद पवार यांना कफाचा त्रास होत असून श्वास घेण्यासही काही प्रमाणात समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे शरद पवार यांना तातडीने गोविंदबाग बारामती या ठिकाणाहून पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटल या ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा