ब्युरो टीम : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या पदांवर अखेर राज्य सरकारने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
दिवंगत अजित पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सक्रिय होते. त्यांच्या निधनानंतर हलय दोन्ही जिल्ह्यात पालकमंत्री पद कोणाकडे जाणार? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर राज्य सरकारने एक अधिकृत परिपत्रक जारी करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा