T20 World Cup : भारताची विजयी घोडदौड सुरूच, सलग दुसरा सामना जिंकला


ब्युरो टीम : भारतीय संघाने टी-20 विश्वचषकातील सलग दुसरा विजय मिळवला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या  सामन्यात भारताने नामिबियाचा पराभव केला आहे. हा सामना 93 धावांच्या मोठ्या फरकाने भारताने जिंकला आहे. 

टी-20 विश्वचषकात भारताचा धावांनी हा सर्वात मोठा विजय आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 9 बाद 209 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नामिबियाने चांगली सुरुवात केली, परंतु फिरकी गोलंदाजी पुढे त्यांचा डाव कोसळला. 19 व्या षटकात त्यांचा संघ 116 धावांवर गारद झाला. या विजयासह भारताने  गट अ गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने