Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज रुग्णालयातून डिस्चार्ज, स्वतः दिली मोठी माहिती


विक्रम बनकर, अहिल्यानगर : तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांना अखेर सात दिवसानंतर आज खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गंभीर जखमी अवस्थेत दाखल झालेल्या महाराजांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महंत आदिनाथ शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी तारकेश्वर गडावर स्वतःवरच धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती समोर आली होती.  या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हादरला होता.

या प्रकारात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते.  मात्र आदिनाथ महाराजांनी स्वतः या गोष्टीचा आता खुलासा केला आहे.

महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांना सात दिवसांच्या उपचारानंतर  रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्यावर डॉ. हर्षवर्धन तनवर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. आज रुग्णालयातून निरोप घेताना महाराज भावूक झाले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि आमदार संग्राम जगताप यांनी महाराजांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. 

डॉक्टरांनी मला मृत्यूच्या दारातून परत आणले. ही घटना मी स्वतःच्या मनाने केली असून मला कोणाचाही त्रास नाही, असे महंत आदिनाथ शास्त्री महाराजांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याचबरोबर गडावर सुरू असलेल्या नारळी सप्ताहला देखील भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आदिनाथ महाराज शास्त्री यांनी केले आहे.

पहा व्हिडिओ : महंत आदिनाथ महाराज शास्त्री नेमकं काय म्हणाले?

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने