Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सन 2026-27 आर्थिक वर्षाचे 59 कोटी अंदाजपत्रक सादर


विक्रम बनकर, अहिल्यानगर : जिल्हा परिषदेचे सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे 59 कोटी 53 लाख 31 हजार 481 रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी अंदाजपत्रक जाहीर केले. यात जिल्हा परिषद शाळेत ओपन सायन्स पार्क / अे आय रोबोटिक लॅब, मिशन आरंभ, प्राथमिक शिष्यावृतती परीक्षा, माझी आदर्श शाळा, आरोग्या विभाग पुण्यीश्लोिक अहिल्याषदेवी होळकर एकलुती एक लाडाची लेक, कषि विभाग स्लारी फिल्टयर, ड्रोन फवारणी यंत्र, कृत्रिम ए आय तसेच रस्तेि व दळणवळण सुविधा. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.  यावेळी  मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, दादाभाऊ गुंजाळ, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबासाहेब घोरपडे, लेखाधिकारी माणिक नागरे , संदिप बडे, डॉ बापुसाहेब नागरगोजे, संजय कदम, भास्कर पाटील,  दशरथ दिघे,   सुधिर शिंदे, शिवम डपकर, सहाय्यक लेखाधिकारी विजय बर्डे,  भगवान निकम आदी उपस्थित होते.

वैयक्तिक लाभाच्या योजना

1.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कडबाकुट्टी पुरविणे (समाज कल्याण विभाग रु. 60.00 लक्ष व कृषी विभाग रु. 18.00 लक्ष ) – एकूण - 78.00 लक्ष  ( अंदाजे 342 लाभार्थी)

2. इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलींना मोफत सायकल पुरविणे (समाज कल्याण विभाग रक्कम रु. 45.00 लक्ष महिला बालकल्याण विभाग रक्कम रु. 20.00 लक्ष) एकूण  – 65.00 लक्ष. (अंदाजे 1000 लाभार्थी)

3. इयत्ता 5 वी ते 10 मध्ये शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जेन्टस सायकल पुरविणे (समाज कल्याण विभाग) – रु. 34.10 लक्ष (अंदाजे 525 लाभार्थी)

4. मागासवर्गीय शेतकऱ्यांना पानबुडी मोटार खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे (समाज कल्याण विभाग) – 42.00 लक्ष (अंदाजे 420 लाभार्थी)

5. मागासवर्गीय व्यक्तींना हॅण्डऑपरेटेड पॉवर विडर खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे (समाज कल्याण विभाग ) – 60.00 लक्ष (अंदाजे 200 लाभार्थी)

6. मागासवर्गीय व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी घेणेकरीता अर्थसहाय्य पुरविणे. (समाज कल्याण विभाग ) – 50.00 लक्ष (अंदाजे 370 लाभार्थी)

7. मागासवर्गीय महिलांना लघुउदयोगसाठी पिकोफॉल मशिन खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे (समाज कल्याण विभाग ) – 70.00 लक्ष (अंदाजे 583 लाभार्थी)

8. दिव्यांग व्यक्तींना स्वंयरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे (पिठाची गिरणी) (दिव्यांग कल्याण विभाग ) – 30.30 लक्ष (अंदाजे 224 लाभार्थी)

9. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य (फोटोकॉपी मशिन) (दिव्यांग कल्याण विभाग ) – 32.00 लक्ष (अंदाजे 62 लाभार्थी)

10. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी शेवई मशिन खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे. (दिव्यांग कल्याण विभाग) – 27.40 लक्ष (अंदाजे 110 लाभार्थी)

11. ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे (महिला व बालकल्याण विभाग) - 47.00 लक्ष (अंदाजे 1340 लाभार्थी)

12. किशोरवयीन मुलींसाठी जेंडर विषयक / आरोग्य व कायदेविषयक प्रशिक्षण देणे. (महिला व बालकल्याण विभाग) रु. – 10.58 लक्ष (अंदाजे 160 लाभार्थी)

13. ग्रामीण भागातील दिव्यांग महिलांना / दिव्यांग बालकांना साहित्य पुरविणे. (महिला व बालकल्याण विभाग) रु.  – 9.20 लक्ष (अंदाजे 46 लाभार्थी)

14.   ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्लरी फिल्टर उपकरण अनुदानावर देणे – 40.00 लक्ष (कृषी विभाग) (अंदाजे 200 लाभार्थी)

15. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटंूबाला शेती उपयोगी साहित्यापोटी अनुदान देणे (कृषी विभाग प्रती लाभार्थी रु. 50000/- मर्यादेपर्यंत) रु. 10.00 लक्ष (अंदाजे 20 लाभार्थी)

16. जिल्हयातील पशुपालकांना दुध काढणी यंत्रांंचा 60 टक्के अनुदानावर पुरवठा करणे 

- 20.00 लक्ष  (पशुसवंर्धन विभाग) (अंदाजे 133 लाभार्थी)

17. जिल्हयातील पशुपालकांना पशुधनाकरिता मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे- 15.00 लक्ष (पशुसवंर्धन विभाग) (अंदाजे 75 लाभार्थी)

18. साथीच्या रोगामध्ये / विषबाधेमुळे जनावरे मृत झाल्यास त्यांच्या मालकांना नुकसान भरपाई म्हणुन अनुदान मंजुर करणे - 30 लक्ष (पशुसवंर्धन विभाग) (अंदाजे 300 लाभार्थी)

वरील वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी रक्कम रु. 660.58 लक्ष तरतूद करण्यात आली असून साधारणपणे जिल्हयातील 6110 लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

करण्यासाठी 50 लाख रुपये, मिशन स्पार्क अंतर्गत थुंबा केरळ येथे विक्रम साराभाई स्पेस सेंटर, इसरो, आयआयएस, डीआरडीओ अशा संशोधन संस्थांमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहली आयोजित करण्यासाठी 28 लाख 50 हजार रुपये, मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 3 री, 4 थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारी पुस्तिका छापणे, इयत्ता 4 थी व 7 वी सराव परीक्षा घेणे तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करणे व ऑनलाईन तासिकांसाठी 6 लाख रुपये, जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फी भरणे, सराव परीक्षा घेणे व सराव प्रश्नसंच पुस्तिकांसाठी 35 लाख रुपये, सुरभि सुरक्षा अभियानांतर्गत गायी म्हशीच्या पोटातील  लोहजन्स वस्तूंपासून प्रतिबंध व उपायांकरिता साहित्य व उपकरणे पुरवणेसाठी 10 लाख, ड्रोन फवारणी यंत्र देण्यासाठी 70 लाख रुपये, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्लरी फिल्टर उपकरण अनुदानावर देण्यासाठी 12 लाख 50 हजार रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इमारतींवर सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी 10 लाख रुपये, जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते व दळणवळण सुविधेसाठी 3 कोटी 95 लाख रुपये, जलधारा अंतर्गत जलसंधारण कामाची देखभाव व दुरुस्तीसाठी 1 कोटेी आदी तरतूदी अंदाजपत्रकात करण्यात आल्या आहेत.

याशिवाय वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी तरतदू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कडबाकुट्टी पुरविणेसाठी 55 लाख रुपये, इयत्ता 5 वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सुमारे 1000 मुलींना मोफत सायकल देण्यासाठी 60 लाख रुपये, इयत्ता 5 वी ते 10 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे 616 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जेन्टस सायकल देण्यासाठी 37 लाख रुपये, मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्प्रे पंप खरेदीसाठी 52 लाख रुपयांचे अर्थसहाय्य, मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्प्रिंकलर खरेदीसाठी 55 लाख रुपये, मागासवर्गीय व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी घेण्यासाठी अर्थसहाय्य पुरविण्यासाठी 50 लाख रुपये, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी देण्यासाठी 30 लाख 30 हजार रुपये, दिव्यांग व्यक्तींना  स्वयंरोजगारासाठी झेरॉक्स मशीनसाठी 30 लाख 30 हजार रुपये, ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी 33 लाख रुपये, ग्रामीण भागातील दिव्यांग महिला, बालकांना साहित्य पुरवण्यासाठी 3 लाख 65 हजार रुपये, शेतकऱ्यांना स्लरी फिल्टर उपकरण अनुदानासाठी 12 लाख 50 हजार रुपये, पशुपालकांना दूध काढणी यंत्रांचा 60 टक्के अनुदानावर पुरवठा करण्यासाठी 20 लाख रुपये, पशुपालकांना मुक्त संचार गोठा उभारण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदानासाठी 15 लाख रुपयांची तरतदू करण्यात आली आहे



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने