T20 World Cup :अहमदाबादचा शाप अखेर मोडला! T20 World Cup भारताने जिंकला!


ब्युरो टीम :  टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फायनल सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 255 धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडला फायनल सामन्यात 159 धावा करु शकले. भारतीय संघाने फायनल सामना 96 धावांनी जिंकला. भारतीय संघ 2026 चा टी-20 विश्वचषकाचा फायनल सामना जिंकला आणि चॅम्पियन बनला. फायनल सामना जिंकताच भारतीय संघाने इतिहास रचला.

तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकणारा भारत पहिलाच देश ठरला. तर घरच्या मैदानावर टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला. सलग दोन वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला. म्हणजे टी-20 विश्वचषक जिंकलाच नाही तर त्यासोबतच भारतीय संघाने इतिहास रचला.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने