Delhi :महाराष्ट्र सदनात १ व २ मे रोजी 'कोकण हापूस आंबा महोत्सवा'चे आयोजन


ब्युरो टीम : महाराष्ट्र सदन आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग येथील महाराष्ट्र सदन येथे आगामी १ व २ मे २०२६ रोजी विशेष 'कोकण हापूस आंबा महोत्सवा'चे स. 10 ते 8 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.  महाराष्ट्रातील दर्जेदार हापूस राजधानीतील नागरिकांना उपलब्ध करून देणे आणि कृषी अर्थ व्यवस्थेला चालना देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

कोकणचे सुवर्ण वैभव असलेल्या आणि भौगोलिक मानांकन (GI Tag) प्राप्त हापूस आंब्याचे प्रदर्शन व विक्री या महोत्सवात केली जाणार आहे. कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग,  या जिल्ह्यांतील विशिष्ट हवामानात नैसर्गिकरीत्या पिकविलेला उच्च दर्जाचा हापूस आंबा या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असेल.हा आंबा साकादोष मुक्त असणार आहे. 

या महोत्सवाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या धोरणानुसार, बागायतदार ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला थेट बाजारपेठ मिळणार आहे, तर दुसरीकडे दिल्लीतील ग्राहकांना रास्त दरात अस्सल आणि दर्जेदार आंबा उपलब्ध होणार आहे. 

हा महोत्सव दिनांक १ व २ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून सर्व नागरिकांसाठी खुला राहील. दिल्लीतील फळप्रेमी, नागरिक आणि आंबा शौकिनांनी या महोत्सवास मोठ्या संख्येने भेट देऊन कोकणच्या या शाही मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने