ब्युरो टीम : आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत क्वालिफायर-१ लढतीत आरसीबी संघाने गुजरातचा ९२ धावांनी पराभव केला आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये प्ले ऑफमधील हा धावांनी सर्वात मोठा विजय ठरला आहे. या विजयासह आरसीबी संघ पाचव्यांदा तर सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये गेला आहे.
आरसीबी ने पहिल्यांदा बॅटिंग करताना २० ओव्हरमध्ये २५४-५ धावांचा डोंगर उभारला होता. कर्णधार रजत पाटीदार याने ९३ धावांची दमदार खेळी केली. त्यासोबतच विराट कोहली आणि कृणाल पंड्या यांनी ४३ धावा महत्वाच्या ठरल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा संघ १६२ वर ऑल आऊट झाला. राहुल तेवतियाने सर्वाधिक ६३ धावांची खेळी करत आरसीबीचा विजय लांबवला.

टिप्पणी पोस्ट करा