Ahilyanagar : अहिल्यानगर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम


ब्युरो टीम :  अहिल्यानगर येथील विद्या प्रतिष्ठान (महाराष्ट्र) नगर केंद्र प. पू. डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या अहिल्यानगर शिक्षणशास्त्र महाविद्यालयचा  बी. एड. प्रथम वर्षाचा निकाल 100 टक्के लागला आहे. 

नुकत्याच जाहीर झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बी. एड. प्रथम वर्षाच्या परीक्षेच्या निकालात शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी शिक्षक / शिक्षिका चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. 

संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण, कार्यवाह सोमनाथ दिघे, सहकार्यवाह माजी प्राचार्य प्रा. डॉ. रवींद्र चोभे, नवनियुक्त प्राचार्य प्रा. डॉ. शिवाजीराव देसाई, माजी प्राचार्य प्रा. डॉ. अमरनाथ कुमावत, उपप्राचार्य प्रा. डॉ. गोकुळदास लोखंडे, महाविद्यालयीन विभाग प्रमुख प्रा. डॉ. शर्मिला पारधे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रदीप शेळके, प्रा. डॉ. अविनाश भांडारकर, प्रा. डॉ. दादासाहेब काजळे, प्रा. डॉ. आश्लेषा भांडारकर, प्रा. रुपाली ओक, प्रा. विलास पांढरे, प्रा. मनिषा वर्पे, प्रा. सुनील वाकचौरे, प्रा. अनिता लवांडे, प्रा. विशाल जाधव तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रमोद राणा, सतीश लवांडे, दीपक आढाव, तेजस रोकडे, जयवंतराव मुळे, दर्शन राहिंज, विद्यार्थी प्रतिनिधी, अपर्णा भालेराव यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक / शिक्षिका यांचे अभिनंदन केले आहे.

प्रथम पाच क्रमांक मिळवलेले विद्यार्थी :

कल्याणी राजू चौधरी - प्रथम

ज्ञानेश्वर नामदेव खामगळ - द्वितीय 

भावना संजीव बनकर - तृतीय 

अनिता संतू पाटोळे व आदेश प्रभाकर बचाटे - चतुर्थ 

गौरी किशोर सुर्यवंशी व पौर्णिमा बाळासाहेब जाधव - पाचवा क्रमांक

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने