ब्युरो टीम : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत केंद्र प. पू. डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान, केडगाव, अहिल्यानगर येथील शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचा (शैक्षणिक वर्ष 2025/2026) निकाल 100 टक्के लागला. नुकत्याच जाहीर झालेल्या शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाच्या निकालात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक / शिक्षिका चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.
यामध्ये प्रदीप रामदास जगदाळे (प्रथम क्रमांक 78.00 ℅), सुनील भाऊ कोतकर ( द्वितीय क्रमांक 76.38 ℅), राजेंद्र संपत ठोकळ ( तृतीय क्रमांक : 75.38 ℅), , कुलदीप विनायक कुलकर्णी (चतुर्थ क्रमांक : 74.75 ℅), सुनीता चंद्रकांत ठुबे (पाचवा क्रमांक : 73.50 ℅) मिळवला.
संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण, कार्यवाह सोमनाथ दिघे, सहकार्यवाह माजी प्राचार्य, प्रा. डॉ. रवींद्र चोभे, नवनियुक्त प्राचार्य प्रा. डॉ. शिवाजीराव देसाई, माजी प्राचार्य प्रा. डॉ. अमरनाथ कुमावत, उपप्राचार्य प्रा. डॉ. गोकुळदास लोखंडे, विभाग प्रमुख प्रा. डॉ. शर्मिला पारधे, केंद्र संयोजक / परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रदीप शेळके, प्रा. डॉ. अविनाश भांडारकर, प्रा. डॉ. दादासाहेब काजळे, प्रा. डॉ. आश्लेषा भांडारकर, प्रा. रुपाली ओक, प्रा. विलास पांढरे, प्रा. मनिषा वर्पे, प्रा. सुनील वाकचौरे, प्रा. अनिता लवांडे, प्रा. विशाल जाधव तसेच, शिक्षकेतर कर्मचारी प्रमोद राणा, सतीश लवांडे, दीपक आढाव, तेजस रोकडे, जयवंतराव मुळे, श्री. दर्शन राहिंज यांनी सर्वच विद्यार्थी शिक्षक / शिक्षिका यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा