Kolhapur : ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करावे - जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड


ब्युरो टीम : कोल्हापूर  जिल्ह्यातील  ज्या ज्या विभागांना ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट दिले आहे अशा सर्व संबंधित विभागांनी आपले उद्दिष्ट येत्या 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिले.प्रलंबित ध्वजदिन निधी व ध्वजदिन निधी संकलनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली.

जिल्हाधिकारी म्हणाले, प्रलंबित पावती पुस्तकांबाबत संबंधित कार्यालयीन प्रमुखांचा अभिप्राय घेऊन तो जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला सादर करावा. उर्वरित विभागांनी निधी संकलनाबाबत गांभीर्यपूर्वक योगदान द्यावे. तसेच या निधीबाबत जी कार्यालये योगदान देणार नाहीत त्यांची गंभीर दखल घेतली जाईल असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला .

यंदाच्या वर्षी सुमारे 1 कोटी 80 लाख रुपये इतके ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट कोल्हापूर जिल्ह्याला मिळाल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ.भीमसेन चवदार यांनी सांगितले .या बैठकीसाठी डेप्युटी सीईओ (जि.प) ओमप्रकाश यादव ,समाज कल्याणचे सहा.आयुक्त सचिन साळे ,जिल्हा विशेष शाखेचे पो.नि विश्वास पाटील, सहाय्यक संचालक सुनीता नेर्लेकर, कौशल्य विकास विभागाचे सारंग कापूरकर, नायब तहसीलदार नितीन धापसे-पाटील,सहा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने