जैविक खतांमुळे जमीनीची नैसर्गिक व जैविक सुपिकता टिकते

          जमीनीत नैसर्गिकरित्या आढळणार्‍या जीवाणूंपासून जैविक खते तयार केल्यामुळे त्याचा जमीन व पिकांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. जैविक खते ही शाश्‍वत शेतीचा मूलभूत घटक आहेत. पिकास आवश्यक त्या विशिष्ट अन्नद्रव्याची उपलब्धता वाढविणार्‍या जिवंत वा सुप्तावस्थेतील जीवाणूंच्या निर्जंतुक वाहकात केलेल्या मिश्रणास जैविक खते म्हणतात. जैविक खतांमुळे जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपिकता टिकून राहते, असे प्रतिपादन दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकिशोर दहातोंडे यांनी केले.
          कृषी विभागाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील निंबोडीला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्माअंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.दहातोंडे यांनी ’संत्रा पीक बहार व्यवस्थापन व लागवड‘ या विषयावर शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, ऑरेंज व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अंबादास बेरड, उपसरपंच भीमा बेरड, श्रीकांत जावळे, संजय मेहेत्रे, उमेश डोईफोडे, रमेश लगड  यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने