मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने ही नोटीस बजावली आहे. |
|
शिवसेनेचे प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. ईडीने २९ तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. या प्रकाराचे चांगलेच राजकीय पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू लागले आहेत. |
टिप्पणी पोस्ट करा