आ देखे जरा किसमे कितना है दम.. 'ईडी'च्या नोटीस नंतर राऊतांचे सूचक ट्विट

           मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावली आहे. ईडीने बजावलेल्या नोटीसनंतर सूचक ट्विट करून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

          'आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया', या बॉलिवूड चित्रपटातील गाण्याच्या ओळी लिहीत राऊत यांनीही एकप्रकारे केंद्र सरकारला प्रत्युत्तर दिलंय.
          दरम्यान, केंद्राकडून शिवसेनेचे प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. ईडीने २९ तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.
          पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने ही नोटीस बजावली आहे. हा सर्व प्रकार पाहता राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने