अहमदनगर जिल्ह्यात काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत करोना रूग्ण संख्येत १११ ने वाढ झाली आहे. तर, आज ९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. तर, उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार १०१ इतकी झाली आहे.
गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६६ आणि अँटीजेन चाचणीत २२ रुग्ण कोरोना बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, नगर ग्रामीण २, पाथर्डी १, श्रीगोंदा २, मिलिटरी हॉस्पिटल ५ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, अकोले १, कर्जत १, कोपरगाव ९, नगर ग्रामीण ४, पारनेर ४, पाथर्डी ३, राहाता ४, राहुरी २, संगमनेर ७, शेवगाव १, श्रीगोंदा १, श्रीरामपूर ४, इतर जिल्हा ९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, जामखेड ३, कोपरगाव ७, नेवासा १, पाथर्डी ८, राहाता २, संगमनेर १ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २०, कर्जत ३, कोपरगाव ५, नगर ग्रामीण ४, पारनेर १, पाथर्डी २०, राहाता ७, राहुरी १, संगमनेर २५, शेवगाव १, श्रीगोंदा १, श्रीरामपूर २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
१२ मार्च २०२० ते आज (२७ डिसेंबर) सायंकाळी सात वाजपर्येंतची अहमदनगर जिल्ह्यातील आकडेवारी
बरे झालेली रुग्ण संख्या: ६६ हजार ३८१
उपचार सुरू असलेले रूग्ण: १ हजार १०१
मृत्यू: १ हजार ३६
एकूण रूग्ण संख्या: ६८ हजार ५१८
|
टिप्पणी पोस्ट करा