एकच नंबर ! 'या' सायकलस्वाराने केली अशी काही कामगिरी

          दिल्ली ते मुंबई दरम्यान १ हजार ४६० किलोमीटरचा पल्ला असलेले अंतर पाच दिवसात सायकलवर यशस्वीपणे पूर्ण करुन आलेले नगरचे भूमीपुत्र जस्मितसिंह वधवा यांचा नगरकरांच्या वतीने जल्लोषमय वातावरणात स्वागत करण्यात आले.जस्मितसिंह वधवा यांनी जी-टू-जी सायकल राईडच्या माध्यमातून दिल्ली ते मुंबईचा १ हजार ४६० किलोमीटरचा सायकल प्रवास पाच दिवसात पूर्ण केला. यामध्ये रोज २५० किमी १२ ते १८ तास सायकल चालवून हा खडतर प्रवास त्यांनी पुर्ण केला.खडतर रस्ते, उड्डान पूल आदी समस्यांना बाजूला सारत हे यश त्यांनी संपादन केले. यामध्ये संपूर्ण देशातील ४३ स्पर्धक तर ४ परदेशी नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.
          जी-टू-जी सायकल राईड नगरकरांच्या प्रेरणेने पूर्ण केल्याबद्दल नगर शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात दर्शन करुन व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन शहरातून ही रॅली काढण्यात आली. जुने बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आमदार संग्राम जगताप यांनी वधवा यांचे स्वागत केले. वधवा यांच्यासह सहा सायकपटू स्वागत रॅलीत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन सायकल रॅलीद्वारे सायकल चालवून प्रदुषण थांबविण्याचा व आरोग्य उत्तम ठेवण्याचा संदेश देण्यात आला.
          या रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालय येथे झाला. जी-टू-जी सायकल राईड यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल पोलीस दलाच्या वतीनेही जस्मितसिंह वधवा यांचा जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सन्मान केला.पोलीस मुख्यालय येथील समारोपीय कार्यक्रमात हरजितसिंह वधवा व लकी सेठी यांनी जस्मित वधवा यांची खेळात असलेली आवड स्पष्ट करुन त्यांची सायकलिंगची पार्श्‍वभूमी सांगितली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने