पुरातन श्री दत्त मंदिरात नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

           नगर तालुक्यातील अरणगाव येथील पुरातन मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.
           याप्रसंगी भानुदास देवकर, डॉ. रेवणनाथ पवार, गोरख गहिले, छाया गहिले, सोमनाथ गहिले, कोमल गहिले, काशिनाथ गहिले, जालिंदर गहिले, कविता गहिले, फकिरा जाधव, गोरख कल्हापुरे, नरेंद्र भामरे, बापू पवार, विजय शिंदे, सुरेश नाट, बाबासाहेब भांबरे, अंकुश गव्हाणे, प्रितम जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
           यावेळी बोलताना देवकर म्हणाले, 'अरणगाव येथे १०० वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर असून, येथील गहिले कुटुंबीय व ग्रामस्थ मनोभावे पूजाअर्चा करतात. या ठिकाणी नियमितपणे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मोठ्या उत्साहात दरवर्षी धार्मिक उत्सव येथे साजरे केले जातात. या ठिकाणी दत्ताचे ठाणे आहे. या ठिकाणी आता नव्याने श्री दत्त मूर्ती बसविण्यात आली असून, त्याचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा धार्मिक विधीने संपन्न झाला.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने