श्रीराम मंदिरासाठी राबवले जाणार ‘हे’ अभियान

           श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे श्रीराम मंदिर निर्माण निधी अभियान संपूर्ण भारतभर सुरू होत आहेत. नगर जिल्ह्यामध्येही १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत श्रीराम मंदिर निधी अभियान राबविले जाणार आहे.
           नगर जिल्ह्यात हे अभियान दोन टप्प्यात होत आहे. या अभियानात समाजातील सर्व घटकांकडून घरोघरी जाऊन हा समर्पण निधी गोळा करण्यात येणार आहे. हे अभियान श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कार्यकर्ते समाजातील सर्व सज्जन शक्ती, सर्व पंथ, संप्रदाय, धर्माचार्य यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात येणार आहे.
           या निधी संकलनाचे कार्यलयाचे उद्घाटन गौरी घूमट येथील राष्ट्र हित संवर्धक मंडळ (ट्रस्ट ) येथे बुधवार (३० डिसेंबर) रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. तरी सर्व समाजातील श्री रामभक्तानी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने