हजेरी सहाय्यक मार्गदर्शक संघटनेचा राज्यव्यापी मेळावा बीड येथे संपन्न.
बीड हजेरी सहाय्यक मार्गदर्शक संघटनेचा राज्यव्यापी मेळावा नुकताच बीड येथे पार पडला. यावेळी संघटनेचे सरचिटणीस एस.वाय. कुलकर्णी यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष विश्वास खतीब यांनी सुनील क्षीरसागर यांची राज्य सल्लागार व तुकाराम मोरे यांची राज्य सरचिटणीस म्हणून सर्वानुमते निवड झाल्याचे जाहीर केले.
ही बैठक नामदेव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व शासकीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सुर्यकांत इंगळे,आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण खरमाटे, सुनील क्षीरसागर, राजकुमार घायाळ, महादेव नागरगोजे, शेरजमा खान, उध्दव महानोर, अँड व्ही.पी.गोलेवार व नवनाथ नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या वेळी दिवंगत कुलकर्णी यांना अभिवादन करण्यात आले. एस.वाय.कुलकर्णी यांच्या योगदानाबद्दल त्यांच्या पत्नी शोभा कुलकर्णी यांना कार्यगौरव स्मृतीचिन्ह व अभिवादनपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी संघटनेचे दिवंगत अध्यक्ष बिराज साळुंखे यांच्या पत्नी उर्मिला साळुंखे यांना बीड जिल्ह्याच्यातीने पन्नास हजार रुपये व अंबादास सहाने यांच्यातर्फे एकावन्न हजार रुपये, भाऊसाहेब शिंदे यांच्याकडून दहा हजार रुपये, दिलीप कुलकर्णी यांच्याकडून व वकार शेख यांच्याकडून पाच हजार रुपये व इतर अशा प्रकारे एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये कृतज्ञता निधी देऊन गौरवण्यात आले.तसेच एस.वाय.कुलकर्णी यांच्यावर वकार शेख यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा