'ईडी' म्हणजे जेल मध्ये नेण्याची 'शिडी', आठवलेंची तुफान फटकेबाजी

          'महाराष्ट्र मध्ये सध्या ईडी कारवाई सुरू आहे, यामध्ये केंद्र सरकारचा व भाजपाचा कोणताही हात नाही. ईडी स्वतंत्र संस्था आहे. आम्ही काही कोणाला कारवाई करा, असे सांगितले नाही. त्यामुळे विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. तुम्ही संपत्ती कमवा त्याबद्दल कुणाचे दुमत नाही, पण ती करताना त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण वेळेवर देणं महत्त्वाचं आहे. नाहीतर 'ईडी' ची शिडी जेलमध्ये नेईल, हे लक्षात ठेवावे,' असा इशाराच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला.
          शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यावरून राज्यात चांगलेच राजकारण पेटले आहे. नगरमध्ये बोलताना रामदास आठवले यांनी त्यावरही भाष्य केले. ‘आम्ही तुम्हाला घाबरत नाही. आम्ही तुमच्या नादाला लागलो नाही, तर ईडी तुमच्या नादाला लागली आहे,’ असा टोला आठवले यांनी संजय राऊत यांना लगावला. ‘संजय राऊत हे माझे चांगले मित्र आहेत. राज्यसभेत अनेकदा आम्ही जवळजवळ बसलो आहोत. अलिकडे आमच्यात दुरावा आहे. पण त्यांनी घाबरण्याचे अजिबात कारण नाही. नोटीस आली तर चोख उत्तर द्या,’ असा सल्लाही आठवले यांनी दिला. ‘ईडी हा विभाग चौकशी करण्यासाठीच आहे. ईडीला ज्यांचे पेपर मिळतात, त्या पेपरच्या आधारे चौकशी होत असते. एखाद्या नेत्याला त्रास देण्याची भूमिका आमची अजिबात नाही. भाजपवर आरोप होत असला तरी ईडी यंत्रणा स्वतंत्र आहे,’ असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
.....
          खास शैलीत राज्य सरकारवर निशाणा
          'जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा उद्धव ठाकरे यांचे सरकार पडेल थंड... लवकरच होणार आहे या सरकारमध्ये बिघाडी, जाणार आहे महाविकास आघाडी...'अशा आपल्या खास शैलीमध्ये रामदास आठवले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने