"तुम्ही हटवता, की आम्ही हटवू", विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

           देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अहमदनगर मधील लालटाकी येथील पुतळ्याला पूर्णतः झाकून टाकणारे होर्डिंग्ज 'तुम्ही हाटवता, की आम्ही हाटवू' असा आक्रमक पवित्रा घेत विद्यार्थी काँग्रेसने आज मनपाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विद्यार्थी काँग्रेसचे (एनएसयूआय) शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे यांनी याबाबत मनपा प्रशासनाला जाब विचारला.
           काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज याबाबत मनपा प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. मनपा उपायुक्त संतोष लांडगे यांचे दालन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या 'अमर रहे, अमर रहे, पंडित नेहरू अमर रहे' या घोषणांनी दणाणून गेले होते.
           यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेसचे सुजित जगताप, प्रवीणभैय्या गीते पाटील, अमीत भांड, प्रमोद अबुज, राजभैय्या गायकवाड, प्रशांत जाधव, सचिन वारुळे, राज मयूर घोरपडे, सोमनाथ गुलदगड, योगेश जयस्वाल, सिद्धार्थ कारंडे, ऋतिक शिराळे, आदित्य तोडमल, जय शिंदे, साहिल शेख, पप्पू डोंगरे मनोज उंद्रे निखिल गलांडे जोय त्रिभुवन अशोक गायकवाड, सिद्धेश्वर झेंडे, शंकर आव्हाड आदींसह विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने