पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळावी, याकरता राज्य सरकारने आता तत्काळ प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नगर जिल्ह्यामध्ये नगर शहरासह जिल्ह्यातील १ हजार ७९० घरांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
गेल्या काही वर्षापासून पोलिसांना आपल्या हक्काची घरे मिळाली पाहिजे, या दृष्टिकोनातून विचार विनिमय सुरू होता. अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेले आहे. आता या ठिकाणी नव्याने घर बांधण्याचा विषय हाती घेण्यात आला होता. काल, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळाली पाहिजेत, या दृष्टिकोनातून तत्काळ प्रस्ताव सादर करा, असे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने आढावा घेतला असता नगर जिल्ह्यातून १ हजार ७९० घरांसाठी प्रस्ताव सादर झाला असल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यामध्ये १७९० घरे बांधण्याचा प्रस्ताव असून तो सादर करण्यात आलेला आहे, अशी माहिती अधीक्षक पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, 'घरे बांधण्यासाठी हा प्रस्ताव आहे. यामध्ये प्रत्येक पोलिस स्टेशन ची माहिती घेऊन किती घरे प्रस्तावित करायचे आहेत व किती घरे नादुरुस्त आहेत, याची एकत्रित माहिती गेल्या वर्षभरापासून काढण्यात आलेले आहे. त्यानुसार शिर्डी येथे जी घरे मंजूर झालेले आहेत, त्यामध्ये अतिरिक्त घरे सुद्धा द्यावी, त्याची सुद्धा आम्ही या प्रस्तावामध्ये मागणी केलेली आहे. राहुरी येथील पोलिसांच्या घरांचा विषय हा प्रलंबित आहे. त्यासाठी महसूल पातळीवरून तो विषय हाती घेणार आहे. |
टिप्पणी पोस्ट करा