Enough is Enough. समझेनेवाले को इशारा काफी है ! खासदार राऊतांचा इशारा.


          मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावली आहे. यावर आता भाजपा नेते व खासदार संजय राऊत यांच्या मधील संघर्ष आता आणखीनच तीव्र होत आहे. आज खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून भाजपातील काही नेते यांना कायदेशीर कारवाई चा इशारा दिला आहे.

           त्यांनी इंग्लिश मध्ये ट्विट करत लिहले आहे 'माझ्या कुटुंबाला ईडीची नोटीस मिळाल्याची बातमी आल्या नंतर, बरेचसे छोटे कमळ गोदी मिडिया बरोबर बहरत आहेत.परंतु लोकानां माहीत आहे कि पिंज-यातील पोपट राजकीय फायद्यासाठी बाहेर काढला आहे. माझ्या कुटुंबाचे नाव चुकीच्या पद्धतिने पीएमसी बँक व एचडीआयल घोटाळयाशी जोडला जात आहे. मी त्यांना आव्हान देत आहे कि हे त्यांनी सिद्ध करावे किवां कायदेशीर कारवाईस तयार राहावे. बस झाल. समझेनेवाले को इशारा काफी है !. त्यांनी हे ट्विट BJP4India, उद्धव ठाकरे, अमित शहा, किरीट सोमय्या व आदित्य ठाकरे यांना टॅग केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने