पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बेंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 चे उद्घाटन करणार

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज  बेंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 चे उद्घाटन करणार आहेत. सुमारे 2.5 लाख चौरस मीटर परिसरात पसरलेल्या या टर्मिनलच्या लाउंजमध्ये 5,932 प्रवाशांची व्यवस्था असेल. यामध्ये 22 संपर्क दरवाजे, 15 बस गेट आणि 17 सुरक्षा तपासणी मार्ग असतील. हे टर्मिनल-इन-अ-गार्डन या संकल्पनेसह बांधले गेले आहे, जेथे प्रवाशांना आरामदायी वाटेल. विमानतळाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, येथे प्रवाशांना बागेत असल्याचा भास होईल, अशा पद्धतीने ते विकसित करण्यात आले आहे.

टर्मिनल 2 च्या पहिल्या टप्प्याची वार्षिक क्षमता 2.5 लाख प्रवाशांची आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, टर्मिनल विकसित करताना हँगिंग गार्डनची संकल्पनाही डोळ्यासमोर ठेवण्यात आली आहे. त्याची रचना करताना कर्नाटकच्या समृद्ध इतिहासाची आणि सांस्कृतिक वारशाचीही काळजी घेण्यात आली आहे. त्याचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक घटकांनी बनवले आहे. या टर्मिनलमुळे शाश्वत विकासाची नवी दृष्टी निर्माण होईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने