बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर(Jhanvi Kapoor), तिची धाकटी बहीण खुशी कपूर आणि वडील बोनी कपूर यांनी मुंबईतील सब अर्बन वांद्रे येथील पाली हिल भागात ₹ 65 कोटींना एक आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट विकत घेतली आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिने कुबेलिस्क बिल्डिंगमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील 8669 स्क्वेअर फूट बिल्ट अप एरियामध्ये ही मालमत्ता खरेदी केली आहे. यात निवासा व्यतिरिक्त, एक खुली बाग आणि पहिल्या मजल्यावर एक खास जलतरण तलाव देखील आहे.
जान्हवी कपूरच्या या प्रॉपर्टीची माहिती इंटेक्स टॅबवर देण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने 12 ऑक्टोबर रोजी या घराची नोंदणी केली होती. जान्हवी कपूरने या घराच्या खरेदीसाठी 3.90 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे, ज्यामध्ये नोंदणी शुल्काचा समावेश आहे. जान्हवी कपूरने या वर्षी जुलैमध्ये तिचे जुने घर विकले,या अभिनेत्रीचे जुने घर 3456 स्क्वेअर फूटमध्ये बांधण्यात आले होते. जान्हवीने डिसेंबर 2020 मध्ये जुहू येथे 39 कोटी रुपयांना हे घर खरेदी केले होते. जान्हवीने हे घर राजकुमार रावला 44 कोटींना विकले.
जान्हवी कपूरने 2 वर्षात 3 रिअल इस्टेट डील केल्या आहेत. नुकताच जान्हवी कपूरचा मिली हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या माध्यमातून जान्हवी कपूरने पहिल्यांदाच तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत काम केले आहे. जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्यात मिस्टर अँड मिसेस माही, बावल, तख्त, दोस्ताना 2 आणि किट्टी इत्यादींचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा