T20 World Cup 2022 : न्यूझीलंड उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला

 


केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने आज टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी अधिकृतपणे प्रवेश निश्चित केला. तसेच ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात एकूण 180 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे नेट रनरेटच्या आधारे त्यांना न्यूझीलंडच्या पुढे आता जाता येणार नाही. न्यूझीलंडने आज झालेल्या सामन्यात आयर्लंडचा पराभव करून तिसरा विजय नोंदवला.

सात गुणांसह न्यूझीलंडचा संघ या विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. न्यूझीलंडचा निव्वळ रन रेट +2.113 आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार आहे. कर्णधार केन विल्यमसनच्या अर्धशतकाच्या जोरावर शुक्रवारी आयर्लंडचा 35 धावांनी पराभव केला. विल्यमसनच्या 35 चेंडूत 61 धावांनी न्यूझीलंडला 185-6 पर्यंत मजल मारली.

अॅडलेडमध्ये  न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आयर्लंडला 150-9 धावांत गुंडाळले. विल्यमसनने सामन्यानंतर सांगितले की, ज्या चांगलया सांघिक कामगिरीची आम्हाला गरज होती ती आजच्या सामन्यात दिसून आली. आजच्या सामन्यात आयर्लंडन देखील उत्तम प्रतिकार केला. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटलने शानदार हॅट्ट्रिक आपल्या नावावर केली. 

या टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 89 धावांनी दणदणीत विजय मिळवत आपल्या मोहिमेची सुरुवात केली. यानंतर त्यांनी श्रीलंकेचा 65 धावांनी पराभव केला तर अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे वाहून गेला. त्यांचा एकमेव पराभव इंग्लंडविरुद्ध  20 धावांनी झाला. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने