पंतप्रधान ऋषी सुनक यांनी वेस्टमिन्स्टर ट्यूब स्टेशनवर विकली फुले

 


पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी मध्य लंडनमधील वेस्टमिन्स्टर ट्यूब स्टेशनवर गुरुवारी फुले विकून प्रवाशांना आश्चर्यचकित केले. सार्वजनिक ठिकाणी पीएम सुनक यांच्या उपस्थितीमुळे सर्वसामान्यांना त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. अनेकांनी आपल्या पंतप्रधानांसोबत सेल्फी देखील काढले आणि त्यांच्याशी चर्चाही केली. गुरुवारी सकाळी 8 वाजता रॉयल ब्रिटिश लीजन (RBL) च्या वार्षिक PoppyAppeal दरम्यान निधी गोळा करण्यासाठी पंतप्रधान अनेक सैन्य कर्मचारी आणि नागरी सेवक स्टेफन ले रॉक्स (Stephen le Roux)  यांच्याबरोबर याअभियानात सामील झाले.

ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदीत आहे, महागाई गगनाला भिडत आहे आणि राजकीय अस्थिरताही दिसून येत आहे. अशा परिस्थितीत देशाचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासमोर मोठी आव्हाने उभी असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही पीएम सुनक लंडन ट्यूब स्टेशनवर प्रवाशांना पॉपीज (एक प्रकारचे फूल) विकताना दिसले. आपल्या सर्वोच्च नेत्याला असे पाहून लोकांना देखील आश्चर्य वाटले.

लष्कराच्या वतीने निधी उभारणीच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून  पॉपीज (एक प्रकारचे फूल) ​​विकण्यासाठी पीएम सुनक स्टेशनवर उपस्थित होते. ब्रिटनमध्ये, पोपीज नावाची कृत्रिम फुले सैनिकांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ परिधान केली जातात. त्यासाठी ही कागदी फुले विकून लष्करी कल्याणासाठी निधी उभारण्याची वार्षिक मोहीम राबवली जाते. यावेळी लंडनमधील रॉयल ब्रिटिश लीजनने केलेल्या पोपी डे आवाहनात पंतप्रधान सुनक स्वत:ही लष्कराच्या जवानांसोबत सामील झाले.

हे पॉपीज कागदापासून बनवले होते आणि निधी गोळा करण्यासाठी एक फूल £5 मध्ये विकले. रॉयल ब्रिटिश लीजनच्या वार्षिक लंडन पोपी डेसाठी हा निधी उभारण्यात आला.अशा सार्वजनिक ठिकाणी पीएम सुनक यांच्या उपस्थितीमुळे सर्वसामान्यांना त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. अनेकांनी पंतप्रधानांसोबत सेल्फी काढले आणि त्यांच्याशी चर्चाही केली. यानंतर काही लोकांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपला अनुभव सांगितला. भारतीय वंशाच्या पहिल्या ब्रिटीश पंतप्रधानांशी संवाद साधण्याच्या अनुभवाने लोक सुखावले.

रॉयल ब्रिटिश लीजनच्या वतीने पीएम सुनक यांचे आभार मानले गेले. सर्वोच्च नेत्याने गर्दीच्या वेळी येऊन या उदात्त प्रयत्नासाठी वेळ देणे हे कौतुकास्पद काम असल्याचे त्यानीं म्हटले आहे. अचानक ब्रिटनचे पंतप्रधांना भेटण्याची संधी मिळाल्यामुळे लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे याबाबत माध्यमांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. लुईस नावाच्या एका व्यक्तीने, ज्याने सुनककडून £5 मध्ये  ​खरेदी केले, त्यानी पंतप्रधान 'डाउन टू अर्थ' असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने