ब्युरो टीम : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई तथा कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत तशा सूचना दिल्या आहेत. या निवडणुकीसाठी मतदान 30 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.
नियमानुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर बंधनकारक असणार आहे. याकाळात दारू विक्री बंद राहील.
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा