ब्युरो टीम: भारतीय जनता पक्षाने मागील महिन्यात राज्य प्रवक्तेपदाची यादी जाहीर केली होती. आता परत नवीन सुधारित प्रवक्तेपदाची यादी जाहीर केली असून यातपुण्यातील कसाब मतदारसंघातील दिगवंत आ. मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांची निवड झाल्याने टिळक कुटुंबियांना कसबा पोटनिवडणुकीत डावलले जाणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
भारतीय जनता पार्टीचा कसबा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवार कोण असणार याच चर्चा शहरात रंगताना दिसत आहे. पक्षाच्या प्रदेश शाखेने ४२ प्रवक्त्यांनी यादी जाहीर केली असून यात कुणाल टिळक यांचा समावेश केला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून टिळक कुटुंबियांऐवजी हेमंत रसाने यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन लवकरच दिल्लीवरून नावाची घोषणा होणार असलयाचे सांगितले आहे.
महाविकास आघाडीमध्ये कसबा काँग्रेस तर चिंचवड राष्ट्रवादी लढवणार आहे. शुक्रवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहार. त्यामुळे टाकणारे गटाला माघार घयावी लागणार आहे. महाविकास आघाडीच्य उमेदवारांची घोषणा आज होणार आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा