Gadar 2: गदर २ मधून सेट केलं मुलाचं करिअर, 100 कोटी कमावून अनिल शर्मा मालामाल

 

ब्युरो टीम:  तब्बल 20 वर्षांनी 'गदर एक प्रेम कथा' या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला. गदर 2 हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून अवघ्या 2 दिवसात सिनेमानं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

गदर 2मध्ये तारा सिंहच्या मुलाची गोष्ट दाखण्यात आली आहे. अभिनेता उत्कर्ष शर्माने तारा सिंहचा मुलगा जीतेची बालपणीची भुमिका साकारली आहे. सिनेमाच्या सिक्वेलमध्येही उत्कर्षच जीते ची भुमिका साकारतोय. उत्कर्ष हा सिनेमाचे दिग्दर्शक अनिश शर्मा यांचा मुलगा आहे.

अनिल शर्मा यांनी मुलाला स्क्रिनवर पुरेपुर वेळ मिळेल याची संपूर्ण जबाबदारी घेतलेली सिनेमात पाहायला मिळतेय.गदर 2 या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. अनिल शर्मा यांनी यानिमित्तानं एका दगडात दोन पक्षी मारलेत असं म्हणायला हरकत नाही. सिनेमाचा सिक्वेल त्यांनी हिट करून दाखवला आणि त्याचबरोबर लेकाचं करिअर देखील सेट केलं. मोठ्या झालेल्या उत्कर्षचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झालाय. अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्माने अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करत होता.

अनिल शर्मा यांनी 2018मध्ये जीनियस सिनेमातून त्याला लाँच केलं होतं. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. उत्कर्षचा सिनेमातील अभिनय प्रेक्षकांना आवडला होता. पण त्यानंतर उत्कर्ष फार कुठे दिसला नाही.

आता थेट गदर 2च्या निमित्तानं उत्कर्षनं मोठ्या कलाकारांबरोबर ढासू एंट्री केली आहे. उत्कर्षच्या दमदार डायलॉग डिलिव्हरीवर प्रेक्षकांनी टाळ्या देत कौतुक केलंय.सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुख्य भुमिका असलेल्या गदर 2 सिनेमानं पहिल्याच दिवशी 40 कोटींचा गल्ला जमवला. 2023 वर्षातील सर्वाधिक ओपनिंग कमाई करणारा गदर 2 हा दुसरा सिनेमा ठरला. त्यानंतर शनिवारी देखील सिनेमानं 40 कोटींची कमाई करण्याच यश मिळवलं आणि पाहता पाहता रविवारी सिनेमानं 100 कोटींचा टप्पा पार केला. येणाऱ्या काळात गदर 2 200 कोटी देखील सहज पार करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने