ब्युरो टीम : 'तुझे मेरी कसम' म्हणत अभिनेता रितेश देशमुखच्या आयुष्यात आलेली जेनिलिया डिसूझा काही दिवसात देशमुख घराण्याची सून झाली. अभिनेत्री जिनिलिया देशमुखला ही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची लाडकी सून म्हटलं तर खोटं ठरणार नाही.
जिनिलियाचा देखील आपल्या सासऱ्यांवर प्रचंड जीव होता. रितेश आणि जिनिलिया दोघेही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी आपल्या वडिलांच्या आठवण काढल्याशिवाय राहत नाही. विलासराव देशमुख यांचं निधन होऊन आज 11 वर्ष पूर्ण झालीत. आजच्या दिवशी अभिनेत्री जिनिलिया सासऱ्यांच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय.
विलासराव देशमुखांच्या सूनेनं त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये जेनिलिया काय म्हणालीये पाहूयात.रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांनी 3 फेब्रुवारी 2012मध्ये लग्न केलं. विलासरावांनी मोठ्या थाटामाटात लाडक्या लेकाचं लग्न लावून दिलं. रितेश आणि जेनिलिया यांच्या लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यातच विलासराव देशमुखांचं निधन झालं.
त्यांच्या निधनानं देशमुख कुटुंबाना मोठा धक्का बसला होता. विलासराव गेले तेव्हा जेनिलिया ही देशमुखांच्या घरची नवी सून होती. लग्नानंतर जेनिलियाला सासाऱ्यांचा फार कमी सहवास लाभला. मात्र त्यातही दोघांचं नातं फार अतूट होतं.
जेनिलियासाठी ते कायमचं आदर्श होते.हेही तुझे मेरी कसम! रितेश-जेनिलियाचा पहिला सिनेमा 20 वर्षात एकदाही TVवर प्रदर्शित का नाही झाला? कारण आलं समोरजेनिलियानं तिच्या लग्नातील सासाऱ्यांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत जेनिलियानं लिहिलंय, "सगळ्यांचे लाडके पप्पा, मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं आहे की, तुमच्याशिवाय जगणं खूप कठीण आहे.
मला खात्री आहे की तुम्ही जिथे कुठे असाल ती सर्वात खास जागा असेल कारण तुमच्याकडे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची क्षमता आहे. आम्हाला तुमची खूप आठवण येते पप्पा. आपण पुन्हा भेटेपर्यंत खूप प्रेम".View this post on InstagramA post shared by Genelia Deshmukh (@geneliad)अभिनेता रितेशनं देखील वडिलांचं अंत्यदर्शन घेत असताना फोटो शेअर केला आहे. "मिस यू पप्पा" असं म्हणत रितेशनं देखील वडिलांच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली आहे.View this post on InstagramA post shared by Riteish Deshmukh (@riteishd)जेनिलिया आणि रितेश यांचा 'वेड' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. 'वेड'नं सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे. अनेक वर्षांनी रितेश आणि जेनिलियाची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली.
टिप्पणी पोस्ट करा